नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस तुम्ही ज्या बातमीची वाट पाहत होता, ती अखेर आली आहे! पीक-पाण्याचं गणित जुळवताना केंद्र सरकारच्या मदतीचा तो २ हजार रुपयांचा हप्ता किती मोलाचा असतो, हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. लाखो शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची योजना आहे ज्यामुळे शेतकऱ्याला थोडा हातभार लागतो .प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेचा आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका.
नेमकी तारीख आणि वेळ काय?
सरकारने ६ मार्च रोजी अधिकृत नोटीस काढून ही आनंदाची बातमी दिलीय. येत्या १३ मार्च २०२६ रोजी, बरोबर सायंकाळी ५:०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी एका क्लिकवर हा निधी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार आहेत. आसाममधील गुवाहाटी येथून हा भव्य कार्यक्रम होणार असून, या दिवशी जणू शेतकऱ्यांसाठी ‘दिवाळी’च असणार आहे.
नक्की किती पैसे मिळणार?
यावेळी तब्बल ९ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. सरकारने यासाठी १८,६५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नेहमीप्रमाणेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात २,००० रुपये थेट जमा (DBT) होतील.
एक मिनिट… ही गोष्ट नक्की तपासा!
पैसे जमा होणार असले तरी, एक छोटीशी चूक नडली तर तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे खालील गोष्टी नक्की तपासा:
• तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का?
• आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, तो चालू आहे का?
• आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे, तो चालू आहे का?
जर या गोष्टी व्यवस्थित असतील, तर १३ मार्चला तुमच्या मोबाईलवर ‘पैसे जमा झाल्याचा’ मेसेज नक्की येईल!
• महत्त्वाचे मुद्दे
• कधी: १३ मार्च २०२६, सायंकाळी ५:०० वाजता.
• किती रुपये: २,००० रुपये.
• कोणाकडून:पंतप्रधान नरेंद्र मोदी
शेतकरी मित्रांनो, ही माहिती फक्त स्वतःजवळ ठेवू नका. आपल्या गावातील, वाडी-वस्तीवरील इतर शेतकरी बांधवांनाही हा लेख शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वेळेत माहिती मिळेल.